Dawood Ibrahim Most Wanted Underworld Don Dawood Ibrahim In Pakistan Karachi Name Changed To Conceal Identity

  0
  12


  मुंबई: भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमनं आपलं नाव बदललंय का? हा प्रश्न विचारला जातोय, कारण पाकिस्तानी तपास यंत्रणा आयएसआय आणि दाऊद  देशाविरोधात कट रचत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी दाऊदने आपली ओळख लपवण्यासाठी नाव बदल्याची माहिती समोर येत आहे.  दाऊद आपली ओळख लपवून सध्या कराचीमध्ये राहत आहे. 

  दाऊद इब्राहिमचे खरं नाव इब्राहिम कासकर आहे. सध्याचं नाव हाजी सलीम अलियास हाजी अली असे आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेट दहशतवादी, मुंबईचा गुन्हेगार आणि पाकिस्तानाचा नवा ड्रग्ज लॉर्ड दाऊद पाकिस्तानातच आहे. याचे अनेक पुरावे स्थानिक माध्यमांमध्ये आले आहेत.  आधुनिक दहशतवादामध्ये बॉम्ब हल्ले, सीमेवर घुसखोरीसह सायबर क्राईम आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हाजी सलीम याच नावाखाली पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी झाली आहे.  हा हाजी सलीम दुसरा तिसरा कुणी नसून.. दाऊद इब्राहिम असल्याची माहिती मिळत आहे 

  गेल्या वर्षभरात हाजी सलीमनं जवळपास 40  हजार कोटींचे अंमली पदार्थ भारतात पाठवले आहेत. 13  मे रोजी गुजरातच्या किनाऱ्यावर एनसीबीनं तब्बल 12 हजार कोटींचे अंमली पदार्थ पकडले आणि काही जणांना अटक केली.  त्यातला एक जण अफगाणी होता त्याची चौकशी  केली असता र पुन्हा हाजी सलीम हे नाव पुढे आले आहे.

  हाजी सलीम मुळचा अफगाणिस्तानचा असल्याचा दावा आयएसआयनं केला आहे. त्यासाठी काही पुरावेही तयार केलेत. उद्योजक म्हणून तो कराचीमध्ये आला आहे. कराचीमधून त्यानं आपला उद्योग सुरु केला आणि तो व्यापारी झाला. पण, याशिवाय हाजी सलीमविषयी दुसरी कोणतीही माहिती नाही. पण, जेव्हा जेव्हा भारतात पाकिस्तानी बोटींवर कारवाई होते, तेव्हा तेव्हा याच हाजी सलीमचं नाव पुढे येत आहे. 

  दाऊदनं 93 मध्ये घडवलेल्या स्फोटांच्या जखमा मुंबईकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्यानंतरही वेळोवेळी पाकिस्तानच्या मदतीनं भारतात अतिरेकी कारवाया घडवण्यातही दाऊदचा मोठा हात आहे. आता  फक्त  नाव बदलूनही त्याला फायदा झालेला नाही.  कारण, त्याच्या नव्या दहशतीवरही भारतीय तपास यंत्रणांचं लक्ष आहे. 

   एनआयएचा दावा

  दाऊदनं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीनं भारतात आपल्या दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करून मुंबईसह इतर भागात दहशतवादी हल्ले करणं तसेच राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह अन्य काही व्यक्तींवर हल्ले करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणं हाच यामागचा मूळ हेतू आहे. डी कंपनीनं यासाठी एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाल्याचं एनआयएनं या आरोपपत्रात म्हटलेलं आहे. 

  हे ही वाचा :

  Dawood Second Marriage: दाऊद कराचीतच, दुसरे लग्नही केले; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here