Sanjay Raut On Papua New Guinea Prime Minister Touching Pm Narendra Modi Feet Said They Belive On Black Magic Detail Marathi News

  0
  7


  Sanjay Raut on PM Narendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी तिथे पोहचले असता पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारपे (James Marpe) यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पंतप्रधानांनी मोदींनी नमस्कार केला ते भ्रष्टाचारी आहेत आणि काही काळ फरारही होते, असं म्हणत राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

  तसेच राऊतांनी म्हटले की, ‘पापुआ गिनीच्या देशात अंधश्रद्धा, जादूटोणा यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी मोदींचे चरणस्पर्श केले असेल तर त्यात काही विशेष नाही. ते वयाने मोठे आहेत, आम्ही देखील ते समोर आले तर त्यांनी नमस्कार करु.’ असं देखील राऊतांनी म्हटलं आहे. तसेच, पापुआ न्यू गिनी हा फार छोटा देश असून पूर्ण आदिवासींचा देश आहे आणि त्यांचा जगाशी काहीही संबंध नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. 

  पापुआ न्यू गिनी पंतप्रधांनांवर भ्रष्टाचाराचा आरोप : संजय राऊत

  ‘पापुआ न्यू गिनीच्या ज्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींना नमस्कार केला ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फरार होते.’ ते वित्तमंत्री असताना त्यांनी अनेक घोटाळे केले असल्यांचं राऊतांनी म्हटलं. त्यामुळे अशी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमस्कार करत असेल आणि भाजपा त्याचा डंका करत असेल तर त्यांना माझा नमस्कार, असं म्हणत राऊतांनी भाजपावर टिकास्त्र सोडलं. 

  भाजपने पापुआ न्यू गिनीचा इतिहास जाणला पाहिजे : संजय राऊत 

  राऊतांनी म्हटलं की, याआधी जवाहरलाल नेहरु, लाल बाहदुर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे जेव्हा परदेश दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांचे देखील चरणस्पर्श करण्यात आले होते. भाजपला पापुआ न्यू गिनीचा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे. त्या देशाची लोकसंख्या फक्त 80 लाख आहे आणि त्या देशात 850 भाषा बोलल्या जातात. त्या देशाचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे म्हणून त्यांना वाटले असेल की आपण मोदींचा सन्मान करायला हवा. असं म्हणत संजय राऊतांना पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

  गुवाहाटीला गेलेल्या लोकांनी पापुआ न्यु गिनीला जावं : संजय राऊत 

  पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “आमचे जे लोक गुवाहाटीला गेले होते त्यांनी पापुआ न्यू गिनीला जावं. तिथे जाऊन त्यांना हवा तो जादूटोणा ते करु शकतात.”, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टिका केली आहे. 

  महत्त्वाच्या इतर बातम्या :

  ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’; जयंत पाटलांच्या समर्थनात संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी रस्त्यावर



  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here